आज कृष्णजन्माष्टमी, इकडे विदर्भात "कान्होबा" बसवितात

shrikrishna
Last Modified मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (01:48 IST)
आजच्या दिवशी श्री कृष्णाची मूर्ती वाजत गाजत घरी आणल्या जाते, त्याची विधिवत स्थापना होतें, आजूबाजूला पेरलेले जव असतात, वरती फुलोरा असतो.
फुलोरा म्हणजे त्यात पात्या,
करंज्या, वेण्या, फण्या अनारसे आदी वस्तू एका विषष्ठ आकाराच्या लोखंडी कड्या असलेल्या स्टँड वर अडकवून ते श्रीच्या डोक्यावर लटकवून ठेवतात. काही ठिकाणी ते 5, 7,9 च्या आकड्यात असतात. तसेंच नारळ पण त्याच संख्येने लटकवून ठेवतात.

संध्याकाळी आरती, नैवेद्य असतो, रितीनुसार जेवणं करतात.
रात्री भजन, पूजनाचा कार्यक्रम असतो, बरोबर रात्री १२ वाजता "बाळकृष्णा चा"जन्म करतात. "सुंठवडा"प्रसाद म्हणून सर्वांना देतात.
दुसरे दिवशी सकाळी आरती, पूजा, नैवेद्य असतो. दुपारी 4 वाजता भजन असतं. तेव्हाच "गोपाळकाला" करतात.
संध्याकाळी पुनश्च आरती होतें व सर्वांना गोपालकाला दिल्या जातो. "हरीचा काला गोड, झाला गोपाळा ने गोड केला" अस म्हणतात आणि आनंदात ग्रहण करतात.
नंतर अक्षत घालून रात्री 7/8 वाजता मूर्ती हलवून त्यांची आरती होते आणि अशारितीने विसर्जनाची तयारी सुरू होते. वाजत गाजत, गुलाल उधळत विसर्जन एखादे तळ्यावर, अथवा विहिरीत होते.
विसर्जन करून आल्यावर पेरून ठेवलेले "जव"घरातील वडील मंडळींच्या डोक्यावर ठेवतात व त्यांना नमस्कार करतात.
अशारितीने हा उत्सव समाप्त होतो. पुढच्या वर्षी यायचं आश्वासन घेऊन विसर्जन होते, पुनरागमनायच अस म्हणत आपण पुढील वर्षी ओढीनं वाट बघतो.... अशा सांभाळून ठेवल्या जातात परंपरा !!

.......अश्विनी थत्ते


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा । कर जोडुनी कौतुका । नमन ...

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र
बाल योगी भये रूप लिए तब, आदिनाथ लियो अवतारों। ताहि समे सुख सिद्धन को भयो, नाती शिव गोरख ...

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष होता काष्ठ ...

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...