शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (14:45 IST)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019

मुख्य लढत : मुख्य लढत : पूनम महाजन (भाजप) विरुद्ध प्रिया दत्त (काँग्रेस) 
दोन दिग्गज नेत्यांच्या मुलींमधील ही लढत मुंबईती अत्यंत चुरशीची लढत मानली जाते. हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे होता. मात्र, २०१४ साली मोदी लाटेत प्रिया दत्त यांना पराभूत करत पूनम महाजन यांनी या मतदारसंघात बाजी मारली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन  आहेत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत. तर प्रिया दत्त या अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.