शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By

लातूर लोकसभा निवडणूक 2019

Latur lok sabha election result 2019
मुख्य लढत : सुधाकरराव शिंगारे (भाजप) विरुद्ध मच्छिंद्र कामंत (काँग्रेस) 
 
भाजपचे सुधाकर शृंगारे किंवा काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, दोघेही लातूरकरांच्या फारशा परिचयाचे नाहीत. तरीही त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. 
 
कारण ही लढत या उमेदवारांमधली नाहीच. भाजपसाठी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनी आपले राजकीय खुंटे मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सगळी ताकद पणाला लावलीय.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, 
 
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.