मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

आमित शहा यांचे उत्पन्न इतके आहे

Amit shah income description
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गुजरातमधील गांधीनगर मधून  अमित शाह हे  लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे दिल्लीतील मोठे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावेळी हजेरी लावली आहे.  उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली. पाच वर्षात संपत्तीमध्ये 12 लाखांची वाढ झाल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

पत्नीच्या संपत्तीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाह यांचं उत्पन्न  2013-14 मध्ये 41 लाख 93 हजार 218 रुपये  ते 2017-18 मध्ये 53 लाख 90 हजार 970 रुपये वाढ झाली आहे. अमित शाहांच्या पत्नीचं उत्पन्न 2013-14 मध्ये 14 लाख 55 हजार 637 रुपये होतं. ते 2017-18 पर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख 82 हजार 360 रुपये झाले आहे.