शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (08:15 IST)

ईव्हीएम मशीन हॅकींगचा प्रकार झाला नाही तर आम्ही राज्यातील सर्व जागा जिंकू - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या मैदानात 6 मोठ्या राजकीय पक्षांशी लढत दिली हे महत्वाचे असून जर ईव्हीएम मशीन हॅकींगचा प्रकार झाला नाही तर आम्ही राज्यातील सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीबाबत बर्‍याच मुद्द्यांना स्पर्श केला. शिवसेना भाजपच्या भरपूर जागा कमी होतील, असेही ते म्हणाले.
 
पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएममध्ये काही गडबड झाली नसेल तर भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील. सोलापूर, अकोला, सांगली, वर्धा, नागपूर, नाशिक अशा विविध मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने चांगली लढत दिली आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निश्‍चित यश मिळेल.
 
मुस्लिम मतदारांनी शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी या दोघांनाही नाकारले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात फायदा झाला आहे. त्यामुळे आम्हाला अनेक जागा मिळतील. विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवले. यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमधून देशातील मतदार पुन्हा एकदा मोदींना पसंती देत आहे, असे पाहायला मिळत आहे. एनडीएला 300च्या पुढे जागा मिळतील. काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अपेक्षित असलेले यश मिळणार नाही,  मात्र त्यावर किती विश्‍वास ठेवायचा ते उद्याच्या निकालानंतर कळेल, असे ते म्हणाले.