testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मनसे स्वबळावर लढणार लोकसभा, राज ठाकरे यांच्या घोषणेकडे लक्ष

raj thackeray
Last Modified गुरूवार, 14 मार्च 2019 (16:59 IST)
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तरीही राज ठाकरे यांचा करिश्मा असलेली मनसेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात दिसून येते आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबतही सस्पेन्स कायम ठेवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांची सभा घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मनसेचे पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले असून, मनसेची ताकद असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या शहरांवर मनसेचे लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुका लढवायचं ठरलं की याठिकाणी मनसे उमेदवार उभा करतील असे चित्र आहे. येत्या आठवडाभरात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत लढवणार की नाही याबाबत घोषणा करतील.

शिवसेना-भाजपा युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रह धरला होता, मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध करत, मनसेला आघाडीत घेतले तर त्याचा मोठा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य करताना पवार म्हणाले होते की, कोणताही आमदार अथवा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने तो पक्ष संपत नसतो, मनसेची ताकद राज्यात दिसून आली आहे, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसू शकते असं वक्तव्य शरद पवारांनी केले
आहे. त्यामुळे मनसे प्रमुख काय निर्णय घेतात आणि राजकीय कसा धक्का देतात हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.



यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा ...

national news
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

national news
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे ...