शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आई सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात

Sunetra Pawar
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 
 
पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वडील अजित पवार यांच्यासह मातोश्री सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.