गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (00:33 IST)

बाप्परे ६ वर्ष जुना चीज बर्गर विक्रीसाठी

कॅनडातील आँटॅरियो येथे  ग्रामीण भागात राहणाऱ्या डेव अलेक्झांडर या  शेतकऱ्याने  ६ वर्ष जुना चीज बर्गर आणि फ्राईज विक्रीसाठी काढले.  त्याने मॅकडोनल्ड्समधून ७ जून २०१२ रोजी हे पदार्थ खरेदी केले होते. त्याने ईबे या वेबसाईटवरुन हे पदार्थ विक्रीला असल्याचे जाहीर केले. काही वेळात त्यावर जवळपास १५० डॉलरची बोली लागली. परंतु पदार्थ विक्रीच्या आपल्या पॉलिसीमध्ये हा लिलाव बसत नसल्याने ईबे या ई-कॉमर्स साईटने या व्यवहारावर बंदी घातली. विशेष म्हणजे काही वेळात ही बोली वाढत गेली आणि अखेर त्याची किंमत १५० डॉलर म्हणजेच ७,८६९ इतकी झाली. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक मला हे खाण्यास योग्य आहे का असे विचारत असल्याचेही अलेक्झांडर यांनी सांगितले. 
 
अलेंक्झांडर म्हणाले, आम्ही शेतात राहतो, त्यामुळे येथील सगळ्या गोष्टी ठराविक काळाने खराब होतात. पण शहरातही तसेच होते हे पाहण्यासाठी मी हा प्रयोग केला आहे. माझ्या मुलीला मी फास्टफूड मिळत असलेल्या दुकानातून हे पदार्थ आणायला सांगितले आणि त्याचे आयुष्य किती आहे हे तपासले. मागच्या सहा वर्षांपासून हे चीज बर्गर आणि फ्राईज या व्यक्तीच्या ऑफीसमधील टेबलवर असून ते नवीन असल्याप्रमाणेच दिसत आहे. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार, फ्रेंच फ्राईज सकाळी खरेदी केल्यासारखे दिसत आहेत. तर बर्गर काहीसा गडद होऊन कडकही झाला आहे. या व्यक्तीने याचे ट्विट करत फोटोही अपलोड केला आहे.