रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (08:40 IST)

आक्षेपार्ह पोस्टबद्दल माफी मागितली

फेसबुकच्या आंतरराष्ट्रीय धोरण प्रमुखांनी भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीसमोर पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल माफी मागितली आहे. संसदीय समितीने याबाबत फेसबुकला विचारणा केली होती. 
 
संसदीय समितीने निवडणूक, राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरीकांच्या माहितीचे संरक्षण हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहेत. याबाबत फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इन्स्टाग्रामच्या अधिकाऱ्यांना १० दिवसात आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी स्थायी समितीने फेसबुकच्या अधिकाऱ्यांना तुमचे माध्यम हे समाजासाठी आहे का समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी आहे अशी विचारणाही केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने असंवेदनशील पोस्ट केल्याप्रकरणी माफीही मागितली.