1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (16:28 IST)

वाचा, 'भाभीजी घर पर है ' च्या कलाकारांचे मानधन

bhabhiji ghar par hai
'भाभीजी घर पर है' या मालिकेतील कलाकारांचे एका दिवसाचे मानधन कळल्यावर नक्कीच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. या मालिकेत विभूतीची भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखला या मालिकेतील इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळते. आसिफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला केवळ एका दिवसाचे ७० हजार रुपये मिळतात तर सौम्या टंडनला एका दिवसांचे ५५ हजार ते ६० हजार रुपये मिळतात तर शुभांगी अत्रेला एका दिवसासाठी ४० हजार रुपये मिळतात. शुभांगी पेक्षा अधिक मानधन या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौडला मिळते. रोहिताशला दिवसाचे ५० ते ६० हजार रुपये मिळतात. यासोबतच दरोगा हप्पू सिंग म्हणजेच योगेश त्रिपाठीला ३५ हजार, अनोखेलाल सक्सेना म्हणजेच सानंद वर्माला १५ हजार टिका राम म्हणजेच वैभव माथुरला २५ हजार भुरे लालची भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदीला २५ हजार इतके मानधन मिळते.