शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (09:32 IST)

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक असल्याचं पाहायला मिळत. येथे घडलेल्या एक घटनेत केवळ एका शब्दामुळे एका ब्रिटीश महिलेला तरुंगावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
 
या ब्रिटीश महिलेला देशातून जात असताना एअरपोर्टवर अटक करण्यात आली कारण तिने एका युक्रेनी तरुणीविरोधात अपशब्दाचा वापर केला होता. युक्रेनी तरुणीने तिची तक्रार केली होती. ब्रिटीश महिलेने युक्रेनी तरुणीविरोधात F*** YOU या शब्दाचा वापर केला होता. आणि या एका शब्दामुळे तिला दोन वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. 
 
31 वर्षीय ब्रिटीश महिला ब्रायटोनची असून ती इंग्लँड बेस्ड कंपनीत एचआर मॅनेजर आहे. तिच्यासोबत एक युक्रेन तरुणी होती. ऑक्टोबर महिन्यात तिने युक्रेनी तरुणीला रागाच्या भरात F*** You म्हटलं तेव्हा तिला माहित नव्हतं की हा राग तिला कितपत भारी पडेल.
 
ब्रायटोनने सांगितलं की तिने आपल्या फ्लॅटमेटला ऑक्टोबर महिन्यात असा मॅसेज केला होता आणि आता ती दुबई सोडून कायमची ब्रिटेनला जात होती. तिचा व्हिसाही संपत आला होता अशात ती फ्लाइटचं घेण्यासाठी एअरपोर्टला पोहोचली आणि तिला तेथेच थांबवण्यात आले.
 
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ब्रिटीश महिलेने युक्रेनी तरुणीची माफी मागितली आणि तक्रार मागे घेण्यास विनंती केली मात्र तिच्या रुममेटने केस मागे घेण्यास नकार दिला. आता दोन वर्षांसाठी तिला तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. म्हणून दुसर्‍या देशात वावरताना तेथील नियम-कायदे माहित असणे किती आवश्यक आहे हे कळतं.