सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (10:58 IST)

'बिझनेस ऑफ फॅशन ५००' मध्ये दीपिकाचा समावेश

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन ने 'बिझनेस ऑफ फॅशन ५००' मध्ये एकमेव भारतीय अभिनेत्री म्हणून दीपिकाने आणखी एक कामगिरी केली आहे. याआधी दीपिका २०१८ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामिल झाली होती. सर्वात जास्त मानधन स्विकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे. अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ओळख निर्माण केली आहे. 
 
दीपिका लवकरच 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून एक सत्य घटना रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवरी २०२० ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.