Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana जीवनदायी योजनाबद्दल जाणून घ्या

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Last Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:08 IST)
दिनांक 2 जुलै 2012 पासून राजीव गांधी जीवनदायी योजना ह्या नावाने दारिद्र्यरेषेचा खालीस लोकांसाठी ही योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने 20 /11 /2013
पासून ही योजना राज्यव्यापी राबविण्यात आली आहे. ही योजना दारिद्रयरेषेच्या खालीस लोकांसाठी आहे. 13 एप्रिल 2017 च्या शासनाच्या निर्णयान्वये या योजनेस महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु करण्यास मान्यता दिली. या योजनेसाठीची पात्रता :-|

1
लाभार्थी
पिवळ्या, (अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना) आणि केशरी शिधापत्रकंधारी कुटुंब
1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नधारी कुटुंब
शुभ्र शिधापत्रकधारी शेतकरी कुटुंब

2
आरोग्यमित्र
सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध असतात. हे आरोग्यमित्र योजनेअंतर्गत रुग्णाची ऑनलाईन नोंदणी करून, उपचारावेळेस रुग्णांची मदत करतात.

3 रुग्ण नोंदणी
रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रांमार्फत केली जाते. आरोग्य मित्र रुंग्णांची ओळखपत्रे बघून रुंगण्यांच्या नावाची पडताळणी करतात. ओळखपत्रांसाठी लागणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

4 उपचारापूर्वी मान्यता
उपचाराची मान्यता मिळविण्यासाठी ऑनलाइन मिळालेल्या कागद पत्रांची पडताळणी केली जाते. आलेले प्रिऑथ तांत्रिक समितीकडे जाते. जेथे विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार मंजुरी देतात. ही संपूर्ण प्रक्रिया 24 तासात पूर्ण होते. काही इमर्जंसी असल्यास रुग्णालय Emergency Telephonic Intimation (ETI)
घेऊ शकतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिधापत्रिका असणे गरजेचे असते.

5 योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये
या योजने अंतर्गत शासकीय, निम शासकीय, खासगी, धर्मादाय संस्थेचे रुग्णालय समाविष्ट आहे.

6 रुग्णालय
आरोग्य मित्र

7 योजनेत कुठल्या आजारांसाठी उपचार
या योजनेअंतर्गत साधारण शस्त्रक्रिया, नैत्र शस्त्रक्रिया, स्त्रीरोगांवरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदयशस्त्रक्रिया, जठार, आंतड्यांच्या शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव, सांधेचे आणि फुफुसांचे आजारासाठी उपचार उपलब्ध आहे. तसेच 121 उपचारांसाठी पाठ पुरवठा सेवा
उपलब्ध आहे.

8 आरोग्य शिबीर
या योजनेचा लाभ अधिक लोकांने घ्यावा यासाठी आरोग्य शिबीर लावले जाते. ह्यात रुग्णांची तपासणी केली जाते. काही आजार असल्यास उपचारात रुग्ण पात्र असल्यास योजनेअंतर्गत रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाने महिन्यातून कमीत कमी 2 आरोग्य शिबीर लावायला हवे.

9 आर्थिक मर्यादा
या योजने अंतर्गत प्रति कुटुंबास प्रति वर्ष 1.5 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 2 .50 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

10 नि:शुल्क सेवा (Cashless Medical Service)
या योजने अंतर्गत निशुल्क वैधकीय सेवा, पिवळ्या केशरी, शुभ्र शिधापत्रधारी शेतकरी मोफत उपचार घेऊ शकतात. निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, औषधोपचार, शुश्रूषा, भोजन, आणि प्रवास खर्चाचा समावेश आहे.

11 विमा कंपनी
या योजने साठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

12 तक्रार नोंदणी
अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 18002332200 आपण या नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.

संकेतस्थळ – www.jeevandayee.gov.in


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुंबईतील श्यामाप्रसाद ...

चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट,

चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट,
रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची केली मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ...

शरद पवार यांची सिरमला भेट

शरद पवार यांची सिरमला भेट
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु
राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...