1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

कुत्र्याने खाल्ले 14000 चे नोट, काढण्यासाठी खर्च करावे लागले 12000

Dog swallows notes in England
काय आपण असे ऐकले आहे की कुत्रा नोट खाऊ शकतो परंतू हे खरे आहे. ही विचित्र घटना इंग्लंडच्या वेल्ससमध्ये घडली. येथे 9 वर्षाच्या कुत्र्याने आपल्या मालकाचे 160 पाउंड (सुमारे 14 हजार 500 रुपये) खाऊन घेतले. कुत्र्याला नोट खाताना बघून मालकाचे होश उडाले. नंतर मालकाला त्यांच्या पोटातून नोट काढण्यासाठी 12 हजार रुपये खर्च करावे लागले.
 
सूत्रांप्रमाणे, इंग्लंडच्या नॉर्थ वेल्स येथे राहणार्‍या जुडिथ (64) आणि नील राइट (66) बाजारात गेले होते. या दरम्यान त्यांचा कुत्रा ओजी घरी एकटा होता. जेव्हा दोघे परतले तेव्हा घरात फाटक्या नोटा पसरलेल्या होत्या आणि डॉगी जवळ बसलेला होता. या दरम्यान कुत्र्याने 160 पाउंड (सुमारे 14 हजार 500 रुपये) खाऊन घेतले होते.
 
नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून नोटा काढल्या. यात मालकाला त्याच्या पोटातून पैसे काढण्यासाठी 130 पाउंड (सुमारे 12,000 रुपये) खर्च करावे लागले. मालकाने यातून 80 पाउंड (7273 रुपये) नोटा बँकेतून बदलवून घेतल्या.