सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:21 IST)

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, व्हिडियो प्रचंड व्हायरल

प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली  कार गॅस टँकरला धडकल्याने अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामध्ये हा अपघात किती भयानक झाला हे दिसून येतो आहे. मात्र अपघाताच्या या फुटेज मध्ये जो घटना क्रम घडतो आहे, त्यामुळे अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहे. हा संपूर्ण व्हिडियो जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे.
 
गीता या मुंबईहून नाशिककडे प्रवास करत होत्ये, त्याच वेळी शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) हा थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार (MH02 DJ 6488) मागून जबरदस्त वेगात धडकली होती, यामध्ये माळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला. या अपघातात त्यांचे पती अॅड. विजय माळी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळी यांच्या अपघाती निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र अपघात जेव्हा झाला तेव्हा यातील चालक उठून बाहेर येतांना दिसत आहे. त्यामुळे नेमके गाडीत किती लोक होते, गाडी कोण चालवत होते व गाडी मुद्दामून तर धडकवली नाही ना असे अनेक प्रश्न उभे केले आहेत.