मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : शनिवार, 18 जून 2022 (13:06 IST)

विदेशी डांस ग्रुपने काला चष्मा वर डान्स केला व्हिडीओ व्हायरल!

लग्नात किंवा कोणत्याही समारंभात डान्स मध्ये बॉलिवूड गाणे,विशेषतः पंजाबी गाण्यांवर ठेका हमखास धरला जातो. पंजाबी गाणे हे फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नसून परदेशी लग्नकार्यात देखील बॉलिवूड गाण्यांची क्रेझ दिसून येते. लग्नात केलेल्या कोणत्या न कोणत्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयानं व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नॉर्वेजियन डान्स ग्रुप कतरिनाच्या काला चष्मा गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्याला ते किती एन्जॉय करत आहेत हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे येते. 
 
लग्नात होणार्‍या फनी डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असले तरी यावेळी हा व्हिडीओ खूपच खास आहे कारण यामध्ये भारतीय नाही तर परदेशी मुले देसी गाण्यांवर मस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या परफॉर्मेंस पाहणाऱ्याला त्यांची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही. त्याच्या जबरदस्त डान्स स्टेप्स पाहून ते कुठल्या हिंदी गाण्यावर डान्स करत आहे असं वाटत नाही. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हे एका डान्सरने शेअर केले आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रिसेप्शन पार्टीचा दिसत आहे. ज्यामध्ये मुलांचा एक डान्स ग्रुप पार्टीला येतो. आणि प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यांवर नाचू लागतो. ग्रुपमधील सर्व सदस्य त्यांच्या नृत्याच्या हालचाली एक एक करून दाखवतात. त्याचा स्वॅग आणि स्टाइल पाहून सगळेच त्यांच्या प्रेमात पडत आहेत. या डान्स ग्रुपमध्ये नॉर्वेजियन मुलं सूट-बूटमध्ये दिसत आहेत आणि त्यांनी काळा चष्माही घातलेला आहे. यासीन टॅबीच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ती नॉर्वेजियन डान्सर आहे. त्यांचा एक डान्स ग्रुप आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 8.2 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.