गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (12:37 IST)

लसूण सोलण्याची सोपी पद्धत, सोशल मीडियावर व्हायरल

Garlic Peeling Hack Goes Viral on Social Media
किचनमध्ये काही टिप्स अमलात आणून कशा प्रकारे काम सोपे करता येईल याबद्दल अनके जण शोध घेत असतात. त्यापैकी एक काम म्हणजे लसूण सोलणे. अशात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात सोप्या पद्धतीनं लसूण कसे सोलता येईल हे दाखवण्यात आलं आहे. 
 
12 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लसूण अगदी सोप्या पद्धतीनं देखील सोलला जाऊ शकतो हे दाखवण्यात आले आहे. चटकन लसूण सोलण्याची ही विधी व्हायल होत आहे. हे सोलण्यासाठी अतिशय कमी कालावधीत लागत असून यावर खूप प्रतिक्रिया देखील येत आहेत.
 
टिकटॉकवरील हा व्हायरल व्हिडीओ ओरिजिनली @xwowduck या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 1.5 मिलियन व्यूज असून युजरने आपल्या सासूला याचं श्रेय दिलं आहे. त्यांच्याकडून ही पद्धत शिकल्याचं म्हटलं आहे. 
 
या व्हिडीओमध्ये, लसणाच्या कांडीला दोन समान भागामध्ये कापून त्यानंतर त्याला दाबल्यावर अतिशय लवकर पाकळ्या वेगळ्या होताना दिसत आहे.