शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (16:17 IST)

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला आणि पंजा तुटला. मात्र नालासोपाऱयातील अर्थ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तुटलेला पंजा सर्जरी करून सात तासांत पुन्हा जोडला आणि या कामगाराला जीवदान मिळाले.  देवलाल बिघा (21) असे त्या कामगाराचे नाव आहे.
 
सदरचा कामगाराला मशीनचा पार्ट बदली करायचा होता. त्यासाठी त्याने आतमध्ये हात घातला. तेवढय़ात दुसऱया कामगाराने मशीन चालू केल्यामुळे बिघा याचा हात अडकला. त्याच्या हाताचा पंजा क्षणात तुटला. अपघातानंतर कंपनीमालकाने त्वरित देवलाल याला नालासोपारा येथील अर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तुटलेला पंजा प्लॅस्टिकच्या पिशवीत आणला होता. प्लॅस्टिक सर्जन डॉ. मिथिलेश मिश्रा, भूलतज्ञ डॉ. हर्षाली जोशी व अनिल यादव यांनी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्जरी करून देवलालचा तुटलेला हाताचा पंजा पुन्हा जोडला. थोडय़ाच दिवसांत तो कामगार पुन्हा आपल्या हाताची हालचाल करू शकणार आहे.