गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (16:11 IST)

उष्टे टोस्ट आपण देखील आवडीने तर खात नाहीये, व्हिडीओ व्हायरल

If you don't like toast too much
गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत टोस्ट हे कॉम्बिनेशन अनेकांना खायला आवडतं. पण हे टोस्ट पॅक होताना बघितल्यावर संताप होईल. एका बेकरीतील धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात लोक टोस्ट पॅक करण्यापूर्वी त्यावर मुद्दाम पाय ठेवून बसलेले दिसत आहे. तर किळस वाटेल बघून जेव्हा पॅक करण्यापूर्वी एक माणूस टोस्टला थुंक लावताना दिसत आहे.
 
व्हिडीओत पाहू शकता ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावर पाय ठेवून बसले आहेत. एक कामगार तर ट्रेमधील टोस्टवर पुन्हा पुन्हा पाय मारताना दिसत आहे. त्यानंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकतो, नंतर चाटतो आणि मग पॅक करतो. कामगाराचा हा प्रताप पाहून आपल्या आरोग्यासोबत किती खेळ सुरु आहे स्पष्ट कळून येतं.