1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या

प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या आहेत. याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीच्या ४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत रत्नभांडारच्या आतील खोल्यांच्या किल्ल्या हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्र यांनी दिली. समितीच्या १६ सदस्यांनी ४ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कडक सुरक्षेत ३४ वर्षानंतर रत्न भांडारमध्ये प्रवेश केला होता. या सदस्यांना आतील खोलीत जाण्याची गरज नव्हती, लोखंडी जाळीतून आतील भाग पाहता येतो, असे मंदिर प्रशासन अधिकाऱ्याने तपासणीनंतर सांगितले.
 
रत्न भांडारच्या सात खोल्यांपैकी दोन खोल्या बाहेर आहेत. यांचा वापर वेळोवेळी केला जातो. आतील खोल्यांच्या किल्ल्या ना मंदिर प्रशासनाकडे आहेत ना पुरी जिल्हा कोषागाराकडे, असे महापात्र यांनी सांगितले.