testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुरुष नसलेलं गाव

ladies village
Last Modified सोमवार, 16 जुलै 2018 (11:41 IST)
पुरुषी वर्चस्वाला हजारो वर्षांची परंपरा आहे. या वर्चस्ववादी विचारातूनच स्रियांकडे एक उपभोग्य वस्तू मानले जाते. वर्षानुवर्षांपासून या मानसिकतेतून होत आलेले अन्याय-अत्याचार-शोषण पाहिले की पुरुषी मनमानी नसलेले जगात एकही स्थान नाही का, असा प्रश्न पडतो. मात्र, असे एक ठिकाण असून ते केनिया या देशात आहे. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकले किंवा वाचले नसणार की, असेही एक गाव आहे की तेथे पुरुषी मनमानी होण्याचा प्रश्नच येत नाही. हे गाव केनियात असून उमोजा असे त्याचे नाव. या गावात पुरुषांना नो एंट्री (प्रवेश बंदी) आहे. उमोजा या केनियन गावात सध्या 50 महिला आणि सुमारे 200 लहान मुले राहतात. हे लोक पुरुषांच्या उपस्थितीविना राहतात. पितृसत्ताक समाजाविना उमोजीतील महिला व मुले आरामात जीवन व्यतित करत आहेत. आपल्यासोबत काहीच वाईट होत नाही, याचे त्यांना समाधान वाटते. उमोजी अस्तित्वात येण्याची कहाणी जरा दुर्दैवीच आहे. 1990 मध्ये लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या महिलांनी हे गाव वसवले होते. म्हणजे घरातील अत्याचार, बालविवाह व लैंगिक अत्याचारातून वाचलेल्या महिलांचे हे गाव आहे. अनेक वेळा गावातील महिलांवर दबाव आणण्यात आला. मात्र, त्यापुरुषांच्या नो एंट्रीवर ठाम राहिल्या.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...

मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

national news
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला ...

‘ये दिल माँगे मोअर‘ जेव्हा असे म्हणाले होते शहीद कॅप्टन ...

national news
26 जुलै अर्थात कारगिल विजय दिवस. तो दिवस जेव्हा 18 हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात ...

26 जुलै कारगिल विजय दिवस : कारगिल युद्धाबद्दल जाणून घ्या

national news
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या ...