शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (15:18 IST)

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

marathi film in cannes festival
जगप्रसिद्ध  ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत कुलकर्णी या मराठी तरूणाच्या  ‘#505’ या मराठी लघुपटाची कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. हा चित्रपट महोत्सव ६ मे रोजी होणार आहे. 

#505′ हा लघुपट चांगल्या आणि वाईट मनोवृत्तीच्या दोन व्यक्तींच्या जीवनावर आधारित आहे. या दोन्ही मनोवृत्तीच्या व्यक्तींचे जीवन संकेतने या लघुपटातून अत्यंत कल्पकतेने मांडले आहे. या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन संकेत कुलकर्णी याने केले आहे. तसेच श्वेतप्रिया यांनी या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे तर, निहार दाभडे यांनी संगीत दिले आहे.
 
या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले असून आयलाईन्स पिक्चर्स बॅनरखाली या लघूपटाची निर्मीती करण्यात आली आहे. अभिजीत देशपांडे, हृषिकेश सांगलीकर आणि सारांश मोहिते हे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. तर, सिद्धांत याळगी, अमित नेगान्धी, वृषाली नेगान्धी,चिन्मय शेंडे, दीपक होळी, विठ्ठल याळगी, नीता व प्रदीप कुलकर्णी यांनी या लघुपटाच्या निर्मीतीसाठी मेहनत घेतली आहे.