1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (15:32 IST)

लग्न पत्रिकेवर मोदींचे कौतूक, मोदींना मतदान करण्याचे आवाहन

wedding card
कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. लग्नाच्या पत्रिकेवर लिहिलं आहे की, 'तुम्ही पंतप्रधान मोदींना मतदान करा. हेच आमच्यासाठी गिफ्ट असेल.' ही पत्रिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अनेक जण याला शेअर करत आहे. वर प्रवीण सोमेश्वर यांनी स्वत: हे कार्ड डिझाईन केलं आहे. कुवैतमध्ये काम करणाऱ्या प्रवीण सोमेश्वर यांनी म्हटलं की, पीएम मोदींचं काम आणि त्यांच्या इच्छाशक्तीचं कौतूक करायला हवं. हा त्याच्याच एक छोटासा भाग आहे. बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरला यांचा विवाह होणार आहे.
 
बंगळुरुमध्ये राहणाऱ्या या जोडप्याने पंतप्रधान मोदींच्या फोटोसह सरकारने केलेल्या कामं देखील पत्रिकेवर छापली आहेत. या जोडप्याने आपल्या लग्नाची पत्रिका छापण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नावाचा आधारा घेतला आहे.