1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

सुपर संस्कारी साडी, अँटी-रेप टेकनिकने तयार

काही दिवसांपूर्वी एका महिलेने शॉर्ट्स घालणार्‍या मुलीवर टीका करत म्हटले होते की अशा मुलींचे रेप होतात. या घटनेची प्रतिक्रिया स्वरूप उत्तर दिले आहे बोस्टन येथील तन्वी टंडन यांनी. त्यांच्या टीमने व्यंग्य करत नावांसकट काही काल्पनिक परिधान लाँच केले आहे. यांचे नाव सुपर संस्कारी अँटी रेप साडी, लॉन्ज विअर साडी, बिकनी उर्फ विकली गेली नाही, आयटम नंबर साठी इतर...
 
तन्वी आणि तिच्या टीमप्रमाणे ही मानसिकता विचित्र आहे की कमी कपडे घातणार्‍यांचा रेप होणे निश्चित आहे किंवा अशात रेपची शक्यता वाढते जेव्हाकि आम्ही लहान-लहान मुलींवर दुष्कर्माची बातमी ऐकत असतो.
 
तन्वी एका अशाच वेबसाइटची संचालक आहे जी अशा प्रकाराचे मुद्दे उचलत असते. तिच्या टीमने या प्रकारे आपला विरोध प्रदर्शित केला आहे. अच्छी बच्ची साडी द्वारे त्यांनी लहान मुलींवर होत असलेल्या दुष्कर्मावर प्रहार केला आहे. तसेच एंबिशियस ऑफिस साडी द्वारे त्यांचे म्हणणे आहे की कोणता परिधान आपल्याला रेपपासून बचाव करू शकतो, जेव्हाकि प्रत्येक ठिकाणी आपल्याला निम्नस्तरीय मानसिकता असलेले लोकं भेटतील. एका साडी बद्दल तर त्यांनी म्हटले आहे की ही घातल्याने आपण गायब व्हाल आणि अशात आपला कोणताही अंग दिसणार नाही तर रेप होण्याचा तर प्रश्नच नाही.
 
तन्वीप्रमाणे यावर गंभीर विचाराची गरज आहे आणि आम्ही या प्रकारे त्या लोकांच्या विचारांवर व्यंग्य करण्याचा प्रयत्न केला आहे जे मुलींचे कपडे रेप होण्यासाठी कारणीभूत असल्याचे म्हणतात. खरं तर रेप करणार्‍या विकृत मानसिकतेचा असतो. त्याला नीच कर्म करायचं असतं मग तो महिला, तरुण किंवा लहानशी मुलगी हे सर्व बघत नसतो, त्याला याचा काही फरक पडत नसतो कारण त्याची मानसिकता दूषित असते.
 
त्यांनी म्हटले की देशात 2 महिन्यापासून 70 वर्षांपर्यंतच्या वृद्धासोबत देखील अशा घटना घडत आहे. आमची ही प्रस्तुती त्या लोकांवर व्यंग्य आहे जे आज देखील रेपसाठी स्त्री आणि तिच्या कपड्यांना जवाबदार ठरवतात.