गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (15:43 IST)

हरभजन सिंग करणार गप्पांचा कार्यक्रम

talk show of harbhajan singh

माहिती तंत्रज्ञानातील सुरक्षा आणि उपाय पुरविणाऱ्या क्वीक हील कंपनी आणि हिंदुस्थानी क्रिकेट संघातील आघाडीचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनी ‘क्वीक हील भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या  साप्ताहिक गप्पांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमातून भज्जी चेन्नई सुपर किंग्ज संघातील क्रिकेटपटूंची पडद्यामागची गुपिते उघड करणार आहे. क्वूयू प्ले यूट्यूब चॅनेलवरून ‘क्वीक हील भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. या गप्पांमध्ये क्रिकेटपासून, वैयक्तिक आयुष्यातली मते, काही किस्से, आठवणी अशा विविधांगी विषयांवर चर्चा रंगणार आहे. रॅपिड फायर, रॅप बॅटल, मते आणि कोण काय म्हणाले अशा भागांमध्ये कार्यक्रमाची विभागणी केलेली असून, त्यातून पडद्यामागील गुपिते बाहेर येणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात, तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना कार्यक्रमात येणारा पहिला पाहुणा खेळाडू असणार आहे. हा भाग ८ मे रोजी लाइव्ह प्रसारित होणार आहे. यानंतर ड्वेन ब्रावो, रवींद्र जाडेजा, मायकल हसी, शेन वॉटसन आणि इमरान ताहीर यांच्यासारखे आणखी काही आघाडीचे खेळाडू पुढील भागांमध्ये सहभागी होणार आहेत.