मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (19:51 IST)

काय सांगता,चक्क जेसीबीवरून अनोख्या पद्धतीने लग्नाची वरात काढली

आजकाल शहरापासून गावापर्यंत लग्नांची जोरदार चर्चा आहे. लग्नाचा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच येतो. तरुण पुरुष आणि स्त्रियांना त्यांचे लग्न संस्मरणीय बनविण्यासाठी काही आगळे वेगळे करत आहे. लग्न आयुष्यभर अविस्मरणीय बनवण्यासाठी जोडपे शक्य ते सर्व करतात. वैवाहिक जीवनातही काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्तापर्यंत आपण वरात महागड्या कारमध्ये, घोड्यावर, सजवलेल्या वॅगन किंवा हेलिकॉप्टरवर स्वार होऊन मिरवणुकीला जाताना पाहिले असणार . पण आज आम्हीआपल्याला असे काही सांगणार आहोत जे या पूर्वीआपण  ऐकले नसेल.
 
पाकिस्तानातील लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पाकिस्तानातील हुंझा व्हॅली परिसरातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच चक्क नवरा नवरीची वरात ही  जेसीबीच्या फाळक्यात बसून काढली गेली आहे
 
लग्नानंतर नवरीला घेऊन जाण्यासाठी लोक आलिशान गाड्यांचा वापर करतात. तर कोणी शाही रथ मध्ये आपली वरात आणतात,तर काही लोक चक्क होडीतून आपली वरात आणतात. पण पाकिस्तानच्या या नवरदेवाने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला. जेसीबीला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं, त्यात डीजेची ही व्यवस्था देखील करण्यात आली. आणखी विशेष म्हणजे नवरा नवरीला थेट जेसीबीच्या फाळक्यात उभं करण्यात आलं. वरातात वऱ्हाडी मंडळी नाचत गाजत चालत होती. हे जोडपं सर्वांचं अभिवादन करत होतं.
 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.