बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (11:01 IST)

गाण म्हणनं ही इश्वरी देणगी आहे ते परमेश्वराचं वरदान आहे...

The song is a gift from God
बर्याच दिवसांपासून रानू मंडल विषयी ऐकल जात आहे. ह्या बाईच कौतुक करावं तेवढ कमी आहे. अन त्यातही सलमान खान अन हिमेश रेशमियाला मानावं लागेल ज्यांनी रानू मंडल सारखी गायिका शोधून काढली. रानू मंडलची संपुर्ण कहाणी तुम्हाला सोशल मिडीयावर वाचायला मिळेल. हिमेशही रेल्वे स्टेशनवर गात होत असाच तो मोठा झाला त्यामुळे त्याला रानू मंडल विषयी फार आपुलकी वाटलीच असेल. आवाजाची जादू म्हणजे रानू मंडल. येवढ फेमस रातोरात कुणी होत नसत तर सोशल मिडीयावर रानू मंडलच्या आवाजानं वेळीच मोहीनी टाकलीय अन तिचं गाण लोकांना भावलं ते ऐकून सुरुवातीला आम्हालाही खूप आवडलं. खरच असल्या सुरेख आवाजाच्या व्यक्ति मिळणं तस खुप अवघड असत. गायिकाचा खुप सराव करुनही कुणाचा आवाज एवढा सुरेख मोहीनी टाकेल असा होणं देवाची देणगी म्हणावी.

रानू मंडल सोशल मिडीयात फेमस झाली अन रातोरात स्टार झाली. लाखों फॉलोवर्स मिळाले लाखो रुपये मिळाले. बॉलिवूड मधून कुणी घर दिल तर कुणी गाडी दिली. बघता बघता ह्या बाईचे दोन स्वत: चे गाणे रिलीज झाले. कुणी कल्पना ही करु शकत नाही अशी ही हकीकत कधी सत्त्यात येईल रानू मंडलने कल्पना पण केली केली नसेल. पण फेमस झाल कि व्यक्तिला टिकेचा बळी मार सहन करावा लागतो. अन तसच काहीसं रानू मंडल यांच्याशी झालं. खर बघायला गेल तर कुणाच गाण कॉपी करुन ते म्हणनं त्या गाण्याच कौतुकच असत पण नेमकं रानू मंडल ने लता दिंदिंच गाण म्हटलं अन लता दी भडकल्या साहजिक आहे कुणी आपलं गाण चोरत असेल अन म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे. पण काल परवा आलेली ही व्यक्ती लता दींची जागा अशी एकदम अचानक घेवू शकेल ? नाही ना मग उगाच तिचं कौतुक करायच सोडून लता दी तिच्यावरच टिका करायला लागल्या असो. लता दींचा आपण आदर केलाच पाहीजे लतादींची जागा रानू मंडलच काय कुणीही घेवू शकत नाही. हे थोडं त्यांच्या लक्षात यायला हवय. अन आता रानू मंडल नेही स्वत: चा आवाज निर्माण करायला हवाय आता आपण रातोरात स्टार झाला आहात खुप मोठ्या गायिका होवू पाहात असाल तर कॉपी करनं सोडून स्वत:ची गाणी गायला हवं. स्व कर्तुत्वाचं असेल तर त्याचा नक्कीच सन्मान केला जातो.

आता रानू मंडल स्टेशन पुरता मर्यादीत नसून त्यांच गाण आख्खा भारत ऐकून मंत्रमुग्ध होत आहे. तर ज्यांनी त्यांना मोठ केलय त्यांनी सर्व नियम सांगितले पाहीजेत. ट्रेनिंग द्यायला हवीय जेने करुन रानू मंडल पुन्हा कुणाच गाण कॉपी करणार नाहीत. अन सोशल मिडीयावर लतादींचा सन्मान झाला पाहीजे. गाण म्हणनं ही इश्वरी देणगी आहे ते परमेश्वराचं वरदान आहे असच कुणालाही ते मिळत नसत. सोशल मिडीयावर लता दींवर भडकले आहेत त्यांनी एकदा गाण म्हणून दाखवावं. मगच कुणावर टिका करावी.

- वीरेंद्र सोनवणे