मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (14:17 IST)

चुलीवर बसलेल्या बाबांचा भक्तांना आशीर्वाद देतानाचा व्हिडिओ व्हायरल

Baba sitting on stove goes viral akola video
Photo - Twitter
या जगात अनेक बाबा आहेत कोणी एकापायावर उभे आहे तर कोणी आजार बरे करण्याचा दावा करता. सध्या ट्विटरवर चुलीवर बसलेल्या बाबांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये हे बाबा चक्क पेटलेल्या चुलीवर ठेवलेल्या मोठ्या तव्यावर बसले आहे आणि भक्तांना आशीर्वाद देत आहे. धोतर नेसलेले हे बाबा लोकांशी बोलत आहे आणि लोक त्यांच्या पायापडून आशीर्वाद देत आहे. 
सदर व्हिडीओ अकोल्यातील असून हा @Liberal_India1 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत युजर्स ने चुलीवरील मिसळ, मटण आईस्क्रीम नंतर आता चुलीवरील बाबा आले बाजारात असे कॅप्शन दिलेआहेत.