शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (11:29 IST)

काय सांगता;सोन्याचा वडापाव,किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

मुंबईचा वडा पाव जगभरात प्रसिद्ध आहे.महाराष्ट्रातच नह्वे तर आता देशात कुठे ही वडापाव मिळू लागला आहे.एवढेच नवे तर सध्या परदेशात देखील वडा पाव मिळतो.वडापाव साधारणपणे 10 रुपया पासून ते 50 -60 रुपया पर्यंत मिळतात.

परंतु सध्या सोशल मीडियावर सोन्याच्या वडापावाची चर्चा आहे.हा वडापाव दुबईत विकला जात आहे.आणि हा वडापाव 22 कॅरेट सोन्याचा असून किंमत तब्बल 2000 रुपये आहे.हा वडापाव गोल्ड प्लेटेड असून बटर आणि चीज पासून बनलेल्या या वडापाव वर सोन्याचे वर्ख लावले आहे.आता हा वडापाव विकत घेण्याऱ्या साठी प्रश्न आहे की,हा वडा पाव खायचा की कपाटात तिजोरीत ठेवायचा.