शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (18:10 IST)

भाजपला धक्का : खासदार उन्मेश पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, तिकीट नाकारल्यानं संताप

Jalgaon MP Unmesh Patil joins Sena (UBT)
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश केला. उन्मेष पाटील हे जळगाव मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. मात्र भाजपने त्यांना यावेळी पुन्हा उमेदवारी दिली नाही.
 
पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (UBT) प्रवेश केला. महाविकास आघाडी (एमव्हीए) त्यांना जळगावमधून उमेदवारी देऊ शकते. जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिले आहे. तिकीट कापण्यात आल्याने ते संतापले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
उद्धव गोटात गेल्यानंतर उन्मेष पाटील म्हणाले की, भाजपने माझ्या कामाला महत्त्व दिले नाही, एका भावाने माझा विश्वासघात केला असला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे. शेतकरी, मजुरांच्या हितासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.