शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (23:24 IST)

Loksabha Election 2024 :इंडिया आघाडीचे नेते दलित, मागासवर्गीय वर्ग आणि आदिवासींचे आरक्षण रद्द करण्याचा तयारीत -पंत प्रधान नरेंद्र मोदी

narendra modi in khargone
महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची बीड येथे आज सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, बीडचे पालक मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंकी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, बीड जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, इंडिया आघाडीतील चारा घोटाळ्यातील नेते लालू प्रसाद यादव यांनी नमूद केले आहे की दलित, मागासवर्गीय, आदिवासींचे आरक्षण काढून मुसलमानांना देण्यात येईल. परंतु जो पर्यंत मोदी जिवंत आहे तो पर्यंत कोणीही दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोकांचे आरक्षण रद्द करू शकणार नाही. आज बाळासाहेबांची खरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप सोबत आहे. तर नकली शिवसेना ही काँग्रेस पक्षासोबत आहे. 

भाजपने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु केले मात्र महाविकास आघाडीने त्यात अनेक अडथळे आणले. मागील 60 वर्षात काँग्रेस पक्षाने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. पण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. 
 
बीड परळी रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण होणार. गोपीनाथ मुंडे यांचे मराठाविकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे त्यांच्या लेकीला 13 मे रोजी अधिक मताने निवडून विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. 
 
Edited By- Priya Dixit