testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'राक्षस' सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

rakshas marathi movie
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (14:38 IST)
दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित 'राक्षस' हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. राक्षस सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या 'राक्षस' सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे.
सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. 'शाळा', 'फॅंड्री', 'सिद्धांत' या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले 'चौर्य', 'राक्षस' आणि 'एक नंबर' हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. 'शाळा'चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ, 'फॅंड्री'चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. 'राक्षस' हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण
खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे ...

national news
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी ...

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

national news
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने ...

वन लाइनर मराठी जोक्स

national news
जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला घोरणे

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...

आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला ...

national news
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी ...