रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. कुंभमेळा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (18:15 IST)

हरिद्वार कुंभ वर्ष 2021 चे 6 प्रमुख स्नान आणि तारखा जाणून घ्या

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुंभ मेळाव्यात जास्त भाविक समाविष्ट होऊ शकणार नाही. यंदाच्या वर्षी कुंभ स्नान प्रामुख्याने 6 आहे. जाणून घेऊ या कधी पडणार आहे हे स्नान.
 
* 14 जानेवारी 2021 पहिले कुंभ स्नान गुरुवारी रोजी होईल, या दिवशी मकर संक्रांत आहे.
 
* 11 फेब्रुवारी 2021 रोजी दुसरे कुंभ स्नान गुरुवारी रोजी होईल, या दिवशी मौनी अमावस्या आहे.
 
* 16 फेब्रुवारी 2021 रोजी तिसरे स्नान मंगळवारी होईल, या दिवशी वसंत पंचमी चा सण आहे. 
 
* 27 फेब्रुवारी 2021 रोजी चवथे स्नान शनिवारी होईल, या दिवशी माघ पौर्णिमा आहे.
 
* 13 एप्रिल 2021 रोजी पाचवे स्नान मंगळवारी होईल, या दिवशी गुढी पाडवा असून चैत्र नवरात्राची सुरुवात होईल.
 
* 21 एप्रिल 2021 रोजी सहावे स्नान बुधवारी होईल,या दिवशी श्रीराम नवमीच्या सण आहे.
 
 हरिद्वार कुंभ वर्ष  2021 च्या शाही स्नानाच्या तारखा-
 
1 यंदाच्या वर्षी पहिले शाही स्नान 11 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी होईल.
 
2 दुसरे शाही स्नान 12 एप्रिल रोजी ,सोमवती अमावास्येला होईल.
 
3 तिसरे शाही स्नान 14 एप्रिल मेष संक्रांतीला होईल.
 
4 चवथे शाही स्नान 27 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला होईल.