शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (12:50 IST)

फडणवीस यांनी आरएसएसच्या बैठकीला हजेरी लावली, विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यावर चर्चा!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार असून प्रत्येक पक्ष त्यासाठी रणनीती आखत आहे. विधानसभेसाठी बैठकांच्या माध्यमातून भाजप आणि संघ परिवार देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवर रणनीती आखत आहे. काल शुक्रवारी भाजप आणि संघाची एक बैठक झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. ते संध्याकाळी 7:30 ते 10 वाजे पर्यंत या बैठकीला उपस्थित होते. 

या बैठकीत भाजप आणि शिवसेना 2019 साली विभक्त झाल्यावर भाजपला एकनाथ शिंदे आणि अजितपवार गटाला सामील करावे लागले. त्याची राजकीय चर्चा करण्यात आली. या बैठकीत 36 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना गटात सामील केल्यामुळे अपयशाला सामोरी जावे लागले अशी कबुली त्यांनी दिली. या वर सविस्तरचर्चा करण्यात आली असून फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही बदल करण्याचे संकेत दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून काही विद्यमान आमदारांची तिकिटे कापून नव्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही  खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली मात्र रक्षा खडसे आणि नितीन गडकरी यांनाच यश मिळाले.  ते म्हणाले, शिंदे- पवारांना सोबत घेऊन महायुती करून अनेक रखडलेली कामे करता आली. आता विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे फडणवीसांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भाजपकडे असलेल्या राज्यसभेच्या दोन रिक्त जागांपैकी एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाईल. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभा सोडल्यानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत.
Edited by - Priya Dixit