बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (11:11 IST)

काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला

Ramdas Athawale
Ramda Athawale News : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा प्रचार करताना काँग्रेसवर निशाणा साधला असून, गंभीर आरोपही केले आहे.
 
माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे लातूर जिल्ह्यातील निलंगा गावात भाषण करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस सातत्याने फसवणूक करत असल्याचे सांगितले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार आठवले यांनी मतदारांना आवाहन करून या काँग्रेसला हाकलून द्या, असे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार आरोप केले. आठवले पुढे म्हणाले की, गेल्या 65 वर्षात काँग्रेसने केवळ जातीयवादी राजकारण केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी चांगलाच गोंधळ घातला होता. तसेच संविधानामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्वोच्च पदावर सामान्य माणसाप्रमाणे काम करू शकले आहे.

Edited By- Dhanashri Naik