शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Updated : गुरूवार, 3 मार्च 2022 (16:35 IST)

Maharashtra Budget Session 2022 आज विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरुवात

आज विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरुवात होत आहे. काल चहापानावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली. 
 
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी केली असून राज्यपालांविरोधात प्रस्ताव आणण्याचा विचार करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.