जंगल सफारी विदर्भातील

jungle safari
विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. य अभयारण्यांना
भेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय
प्राणिसंग्रहालय लवकर झाले तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी निविदा काढली होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्राणिसंग्रहालाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ आणि खासगी गुंतवणूकदारांच्या भागीदारीतून कंपनीची स्थापना केली जाणार आहे. परंतु एकही निविदा प्राप्त न झाल्याने राज्य सरकारच्या 2019 पर्यंत प्राणिसंग्रहालय विकासाला खीळ बसणार आहे. प्राणिसंग्रहालाच्या विकासासाठी अद्याप निविदा आल्या नाहीत.

नागपूर येथील अशफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला पूर्वीच 1 कोटी 90 लाख रुपये दिले आहेत. कंपनीने या संपूर्ण प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी बांधकामाचा आराखडा आणि डिझाइन तयार केले असून त्यात काही त्रुटी आहेत.
jungle safari
प्राणिसंग्रहालयाची वैशिष्टय़े अशी आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग पर्यटनास चालना देणे. वन्यजीवन संवर्धनासाठी संशोधन आणि शिक्षण, जखमी झालेल्या आजारी प्राण्यांच्या तसेच परवानगी नसलेल्या आणि जप्त प्राण्यांचे पुनर्वसन, मानव आणि वन्य प्राणी यांचतील संघर्षाच्या घटना कमी करणे, अद्यावत प्रशिक्षित केंद्र विकसित करणे, रोजगार आणि स्वंरोजगार उपलब्ध करणे, प्रकल्पातील सुविधा, गोंडवाना बायोपार्क, इंडियन सफारी आफ्रिकन सफारी, रिझर्व्ह राइड, गोरेवाडा रिझर्व्ह, वन्यप्राणी नागरिकांना बघण्यासाठी ठेवणारा बचाव केंद्र आणि प्रजनन केंद्र, पर्यटकांसाठी सुविधा, शिक्षण आणि संशोधन यांचा समावेश राहणार आहे.

सध्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. सकाळ, दुपार, संधकाळ अशा तीन वेळात पर्यटक सफारीचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत वन्यप्राणी बचाव केंद्रे उभारली. निसर्ग वाट आणि जंगल सफारी सुरू झाली असून शासनाने परिपत्रक काढले आहे. वन्याप्राणी दत्तक घ्या, त्यांचे मित्र व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
म. अ. खाडिलकर


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

श्रेया घोषालने बेबी बंपसोबत चाहत्यांना दिली Good News

श्रेया घोषालने बेबी बंपसोबत चाहत्यांना दिली Good News
आपल्या मोहक आवाजाने लोकांच्या मनावर राज करणारी गायिका श्रेया घोषाल हिच्या घरात लवकरच आनंद ...

वॉट्सअप रायटर

वॉट्सअप रायटर
जोशीकाकू अंजूला

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे? वकीलानी एकदम ...

आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच

आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच
आयुष्यमान खुरानाद्वारा अभिनीत अनुभव सिन्हा यांचा आगामी ‘अनेक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित ...

अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात, स्वतः पोस्ट करून सुखरूप ...

अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात, स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची दिली माहिती
अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात झाला होता. सुयशने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. सुयश ...