testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा

doodhsagar fall
कॅसलरॉक ते दूधसागर धबधबा हा एक महत्त्वाचा ट्रेकिंग रूट आहे. आपल्या परिसरातील बहुतेक ट्रेकर्सना खुणावणरा, रोमांचक मात्र तरीही धोकादायक नसलेला असा हा ट्रेक आहे. दूधसागर धबधबा जेथे संपतो तेथपर्यंत पोहचण्याचे थ्रील नक्कीच
वेगळे असते. बेळगाव ते गोवा रोडवर चार किलोमीटर आत अनमोड घाटातून कॅसलरॉक रेल्वे स्टेशनला जायचे. तेथून रेल्वेने किंवा चालत 14 किलोमीटरवरील दूधसागर धबधब्याला जाता येते.

दूधसागर धबधब्यापासून पुढे चार किलोमीटरवर सोनोलीन गाव आहे. या ठीकाणी फक्त एकच घर आहे. तेथून चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण मातीचा आहे. त्यावरून चालत जेथे दूधसागर धबधबा संपतो तेथे पोहचतो. हाच दूधसागर ट्रेक होय. कॅसलरॉअक येथून एकूण 22 किलोमिटरचा हा ट्रेक आहे. रेल्वेस्टेशन आळविळ आणि अतिप्रचंड असलेला हा धबधब जेते संपतो ते ठिकाण पाहण्याची मजा आणि थ्रिल वेगळे असते. सोनोलीन गावातून चार किलोमीटरचा रस्ता मातीचा असल्याने त्यावरच चांगली दमछाक होते, तेथून परत दूधसागर येथे येऊन मुक्कामही करू शकतो. येथे कँटीन आहे. तसेच टेंट लावण्यासाठी जागाही आहे. परत यायचे झाले तरीही शक्य होते. शहरातून आपण पहाटे चार वाजता निघालो तर सकाळी साडे सहा वजेपर्यंत कॅसलरॉकपर्यंत पोहचता येते. दुपारपर्यंत ट्रेक संपवून सायंकाळी कॅसलरॉकवर परत येता येते. त्यामुळे रात्री कोल्हापुरात पोहचता येते.


doodhsagar

'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये दाखवलेला नितांत सुंदर धबधबा म्हणजे कॅसलरॉकजवळील दूधसागर होय. या दूधसागरला रेल्वे ट्रॅकवरून कसे जायचे याची माहिती सर्वानाच असते असे नाही. पावसाळ्यात बहुतेक रेल्वे ट्रॅकवरून दूधसागरपर्यत जातात. पण थंडीत हा ट्रॅक करायचा असेल तर रेल्वे ट्रॅक आणि टनेलमधून थोडे पुढे जावे लागतो. दूधसागर जेथे संपतो तेथेही जाता येते. सकाळी लवकर उठून बाहेर पडले तर एका दिवसात हा रोमांचकारी ट्रेक पूर्ण करता येतो..


यावर अधिक वाचा :

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

national news
या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...

अमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार

national news
२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या ...

केदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात ...

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...