बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2016 (12:50 IST)

पावसाळी ट्रॅकिंगची ठिकाणे

महाराष्ट्रामध्ये विविध भागात पावसाळी पर्यटनासाठी अनेक चांगली स्थळे उपलब्ध आहेत. यामध्ये माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्र्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई –पुणे महामार्गाावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्र्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्र्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुध्दा करु शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यामधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्र्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे – नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्यादरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा म्हणजे क्या बात! 

 -चारुशीला बोधे