शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (16:28 IST)

सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत

सिंधुदुर्गात शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले आहे.पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी युतीबाबतचे संकेत दिले आहेत. 
 
“सिंधुदुर्गात भाजपने युती धर्माचे पालन केले आहे. शिवसेनेने मात्र युती धर्म पाळला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युती तुटल्याचे जठारांनी संकेत दिले. स्वाभिमान विलिनीकरण आणि नितेश राणे उमेदवारी हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे.” असेही जठार म्हणाले आहेत.कणकवली मतदारसंघातून भाजपने अखेर नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे राणे यांचे खंदे समर्थक सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या वतीने मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत रंगतदार होणार आहे.