गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (09:58 IST)

इथे जाणार ... तिथे जाणार आता या चर्चा थांबवा, या नेत्याने दिली प्रतिक्रिया

सध्या भाजपामध्ये आणि शिवसेनेत अनेक मोठे नेते प्रवेश घेत आहेत. त्यात आता शिवसेनेत भुजबळ प्रवेश करणार म्हणून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले आहेत की, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, आणि ही चर्चा आता थांबवा, याला पूर्णविराम द्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ हे भायखळा येथे आपल्या गणेश मंडळाच्या गणपती प्रतिष्ठापणासाठी मुंबईत थांबले होते, तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी ही दिलेली प्रतिक्रिया चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी पुरेशी असल्याचं म्हटलं जात आहे.भाजपामध्ये नारायण राणे आणि शिवसेनेत भुजबळ जाणार आहेत, त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात आता भुजबळ यांनी असे मत तर व्यक्त केले आहे, मात्र खरेच असे होणार की नाही त्यावर अजूनही चर्चा सुरु आहे.
 
राष्ट्रवादीतील अनेक बडे दिग्गज नेते, भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याने, बड्या नेत्यांची पक्षप्रवेशाची नावं चर्चेत येत आहेत. यात छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आलं असलं, तरी आपण शिवसेनेत प्रवेश करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.