शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (16:10 IST)

कोथरूडमध्ये आघाडीचा मनसेला पाठींबा

dhandra kant patil
कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. पुण्यातील मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महा-आघाडीकडून पाठिंबा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली.
 
पुण्यातील कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.