1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (16:03 IST)

शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका : संघाचा भाजपाला सल्ला…

Maharashtra government
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाजपाला सल्ला दिला आहे. शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे रा. स्व. संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तेव्हा याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
 
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या  राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भाजपासाठी ते हिताचे राहणार नाही, असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.