मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (16:18 IST)

मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, पवारांचा गडकरीना टोला

I was the administrator in cricket
“मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला. “राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो,” असं गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा पवार यांनी समाचार घेतला. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
“ज्याची मुख्यमंत्रिपदाची मागणी आहे, त्यावर विचार झाला पाहिजे. स्थिर सरकार यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सरकार पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असंही त्यांनी नमूद केलं. “मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळलं,” असं ते म्हणाले.