मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

मनसेचे एकमेव यश; प्रमोद पाटील विजयी

मुंबई – सक्षम विरोधी पक्ष म्हणून साथ द्या, अशी मागणी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी मतदारांनी पुन्हा नाकारले आहे. पक्षाचा केवळ एक आमदार यंदाच्या विधानसभेत दिसेल.
 
मनसेचे प्रमोद पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा सुमारे ५ हजार मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे अमोल केंद्रे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा १८ व्या फेरीपर्यंत शिवसेनेचे रमेश म्हात्रे आघाडी राखून होते. मतमोजणीच्या २५ व्या फेरीलाही रमेश म्हात्रे यांना २१७ मतांची आघाडी होती. मात्र, यानंतर २८ व्या फेरीला जोरदार मुसंडी मारत प्रमोद पाटील यांनी सुमारे ५ हजार मताधिक्याने विजय संपादन केला. प्रमोद पाटील यांना ८६,२३३, तर रमेश म्हात्रे यांना ८०, ६६५ मते मिळाली.