शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (16:04 IST)

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, कोल्हे यांच्याकडे नेतृत्व

NCP's Shivswaraj Yatra
आता राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या शिवस्वराज्य यात्रेची धुरा सोपवण्यात आली आहे. यावेळी उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपतीं शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून सुरू होईल. ही यात्रा रोज ३ विधानसभा मतदारसंघातून जाईल. शिवस्वराज्य यात्रा ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा येथे संपेल.
 
१६ ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल. या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे.