testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

माझा आवाका मला माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

raj thackare
Last Modified शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (10:00 IST)
आजच्या घडीला सर्व राजकीय स्थिती पाहता, मला माझा आताचा अवाका माहीत आहे. विनाकारण जाऊन उंटाच्या ढुंगणाचा मुका कोण घेत बसणार. आपल्या आपल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, सत्ता नको, प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संधी द्या, असं राज ठाकरे म्हणाले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर यांची पहिली सभा मुंबईत पार पडली आहे. मात्र राजकारणाच्या इतिहासात प्रथमच सत्ता नाही तर राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाची मागणी ठाकरे यांनी केली आहे. सरकार जरी असले तरी त्याला वठणीवर आणणारे असा पक्ष असतो तोच प्रतिसरकार म्हणजे विरोधी पक्ष असतो, त्यासाठी मला माझे आमदार निवडणून द्या अशी मागणी राज यांनी सभेत केला आहे. या त्यांच्या मागणीला सोशल मिडीयावर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. कारण राज यांनी पूर्ण राज्यात उमेदवार दिले नाहीत त्यामुळे पूर्ण सत्ता न
नको
तर येणाऱ्या सरकारला जनतेचा राग काय असतो ते दाखवायाला विरोधी पक्ष म्हणून ताकद दया अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज यांचे पूर्ण भाषण :
१) कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. बघा काय अवस्था आहे आपली. घराबाहेर पडल्यावर काय होईल माहित नाही. पुण्यासारख्या शहराची ही अवस्था. अर्ध्या तासाच्या पावसाने शहराचा पार विचका झाला. तर इथे ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. काय दुर्दैवी घटना आहे ही.
२) शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदारांची हिंमत नाही सरकारला प्रश्न विचारायची, मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?

३) पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण? तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतं, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?
४) आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत.. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना? त्यांच्या जाणिवांना? बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य नेहमी म्हणतात,'जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं'. ह्या सगळ्या घटना बघितलं की वाटतं, आपल्या जाणिवा शून्य झाल्यात आपण फक्त प्रेतं झालो आहोत? आणि जर विरोधी पक्षातले नेते सरकारसमोर घरंगळत जाणार असतील आणि जनता सुद्धा सरकारला जाब विचारणार नसेल तर ह्या सरकारला प्रश्न विचारणार तरी कोण आहे?
५) मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी आवाज हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो, मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय.

६) आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. सत्तेसाठी आशीर्वाद घ्यायला मी भविष्यात येईनच पण आज गरज आहे ह्या निरंकुश सरकारला जाब विचारणाऱ्या आवाजांची.
७) माझे उमेदवार तरुण आहेत त्यांच्या पोटात आग आहे, त्यांना संधी द्या, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, ते तुमच्यासाठी आवाज उठवतील, सरकारला सळो की पळो करून सोडतील... सत्ताधारी आमदार कामं करत नाहीत हे आता उघड झालं आहे पण माझे विरोधी पक्षात बसलेले आमदार सरकारकडून कामं करून घेतील.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं औषध
अमेरिकेत राहणारी आठ वर्षांची मिला एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे. मज्जासंस्थेशी संबंधित या ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट
उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...