भर पावसात पवारांनी केली चूक कबूल, २१ ला मतदान करत उदयनराजे भोसलेंना पाडा
सातारा येथे शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी न थांबत सेना भाजपवर टीका करत उदयनराजे भोसलेंन वर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांनी साताऱ्यात तुफानी पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले व लेगेच जोरदार पावसाने सुरुवात केली. मात्र ते थांबले नाहीत तर त्यांनी पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पवार यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी सर्वात मोठी चूक केली होती. त्यावेळी मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून तिकीट दिले होते.
पवार यांची आगोदर पंढरपूर नंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा झाली. पवार पढे म्हणाले की, वरुणराजाने देखील आपल्याला आशिर्वाद दिले असून, त्याच्या आशिर्वादाने सातारा जिल्ह्यात चमत्कार होणार, याची सुरुवात 21 मतदानापासून होणार आहे. पुढे ते म्हणाले की जर माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. तेव्हा लोकसभेच्या निवडणूकीमध्ये माझ्याकडून फार मोठी चुक झाली होती, अशी जाहीर कबुली पवारांनी यावेळी दिली. साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चूक सुधारण्यासाठी 21 तारखेची वाट बघत आहे, अशी आशा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. शरद पवार पावसात भिजून सभा केली त्यामुळे पवार यांची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होती.