सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (10:44 IST)

शिवसेना नेते संजय राऊत आणि छगन भुजबळ यांची भेट नवी राजकीय समीकरणे ?

ऐन विधान सभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे अनेक नेते शिव सेने किव्हा भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ शिव सेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातमीचे रान पेटवले होते. परंतु त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत भुजबळांनी राष्ट्रवादी न सोडण्याचा स्पष्ट केले होते. दरम्यान, रविवारी नाशिक येथे एका खाजगी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ आणि शिव सेनेचे नेते संजय राऊत यांची भेट आणि त्या दोघांमध्ये झालेल्या गुफ्तगु मुळे नाशिक-च्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
 
रविवारी सायंकाळी नाशिक येथे शिवसेनेचे नगरसेवक यांच्या मुलाचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला नाशिकात राजकीय क्षेत्रातील अनेक दिगज्जनी हजेरी लावली होती. त्यातच भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ व शिव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ गुफ्तगु झाली. या दोघांमद्धे नेमकी काय चर्चा झाली हे अजून कळू शकले नसले तरी, या भेटीने नाशिक-च्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया  उंचावल्या. तर अनेक चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ सेनेच्या वाटेवर तर नाही ना? असा प्रश्न पुन्हा नाशिक-च्या राजकारणात जोरात रंगल्या आहेत.