शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

शिवशंकराला महाकाळ का म्हणतात?

भगवान शिवशंकराला अनेक नावांनी ओळखले जाते. शिवाला महाकाळही म्हटले जाते. काळांचा काळ भगवान शिव हा सृजनाचा अधिपती आणि मृत्यूचा देवही आहे. शिवाला सृजन आणि विनाश दोन्हींचा ईश्वर म्हटले जाते.

शिवाला शरीरातील प्राणाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पंच देवांमध्ये शिवाचे स्थान महत्त्वाचे आहे. शरीरात प्राण नसेल तर शरीराला शव म्हणतात. त्यात प्राण आले की शरीराचे शिव बनते. शिव निसर्गदेवता आहे. शिवपूजा आणि शिवशृंगारात वापरण्यात येणारी सामुग्रीही निसर्गात सहज मिळणारी असते.

शिव मृत्यूदेवता आहे. त्रिदेवात शिवाचे रूप संहारक म्हणून आहे. ब्रह्मा सृष्टी रचेता, विष्णू पालनकर्ता आणि शिव संहारक असे वर्णन केले जाते. परंतु शिव संहारक असूनही सृजनाचे प्रतिक आहे. शिव सृजनाचा संदेश देणारा आहे. प्रत्येक संहारानंतर सृजनाला सुरूवात होत असते. पंचतत्त्वात शिवाला वायूचा अधिपतीही मानले गेले आहे. या वैशिष्ट्यांमुळेच शिवशंकराला महाकाळ म्हटले जाते.